Kokan: कुशेवाडा येथे नविन हवामान मापक यंत्र कार्यान्वित

0
76
हवामान मापक यंत्र
कुशेवाडा येथे नविन हवामान मापक यंत्र कार्यान्वित

वेंगुर्ला प्रतिनिधी – परूळे-कुशेवाडा येथील नविन मंजूर हवामान मापक यंत्राचे उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते झाले.गेली कित्येक वर्षे हवामान मापक यंत्र हे खवणे येथे होते. मापक यंत्र चुकीच्या जागी बसविण्यात आले असल्याने पर्जन्य तापमान मापन व्यवस्थित होत नव्हते. त्यामुळे या परिसरातील शेतक-यांना पीक विमा भरपाई मिळत नव्हती. दरम्यान, ही बाब म्हापण परिसरातील भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली आणि नविन यंत्र नविन जागेत बसविण्यासाठी वारंवार पाठपुरवा केला. https://sindhudurgsamachar.in/kokan-कॅरम-स्पर्धेत-प्रबोध-जाध/

तसेच यासाठी माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व भाजपाचे कृषी सेल जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले आहे. हवामान मापक यंत्राच्या उद्घाटनप्रसंगी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, उमेश सावंत, महेश सारंग, गुरूनाथ पाटील, प्रसाद भोजने, बाबली वायंगणकर, निलेश सामंत, प्रसाद पाटकर, प्रदिप प्रभू, प्रकाश राणे, महेश सामंत, चेतन सामंत, रूपेश मुंडये, आपी फणसेकर, नाथा मडवळ, आनंद गावडे, गुरूप्रसाद चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

मागील वर्षी पीक विमा रक्कम भरपाई जिल्ह्यातील ५७ केंद्रांना मिळाली होती. परंतु, म्हापण केंद्रातील शेतक-यांना याचा लाभ झाला नाही. याबाबत पीक विमा मागणीचे निवेदन सर्व शेतकरी बांधव यांनी मनिष दळवी यांना दिले. पाठपुरावा करून लवकरच पीक विमा रक्कम मिळवून देणार असल्याचे आश्वासन मनिष दळवी यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here