सिंधुदुर्ग – मुंबई विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थिनी कु. स्नेहल दीपक लोंढे यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी “रेशीम कीटक व रेशीम उत्पादन‘ यावर चुंबकीय क्षेत्राचा परिणाम” या विषयावर सखोल संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनाचे मार्गदर्शन विज्ञान संस्था, मुंबई येथील जेष्ठ प्राध्यापिका डॉ. अलका कृष्णराव चौगले (बोंडे) यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
कु. स्नेहल यांचे संशोधन रेशीम उत्पादनाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरले असून, त्यांच्या या कामावर आधारित विविध शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘Scopus’ मानांकन प्राप्त जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा आणि कार्यशाळांमध्ये त्यांच्या संशोधनाचे सादरीकरण केले आहे.
कु. स्नेहल लोंढे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोनाळ, तालुका दोडामार्ग येथील प्रसिद्ध नागरिक कै. जयराम राणबाराव लोंढे यांची नात असून, त्यांचे आई-वडील सौ. अक्षता आणि श्री. दीपक लोंढे हे भायखळा, मुंबई येथील रहिवासी आहेत.
कु. स्नेहल यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.