कणकवली : बेळणे खुर्द, ता.कणकवली येथे डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषिदूतांचे आगमन झाले.ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम कृषिदूत राबवणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-पुण्यात-झिका-व्हायरसचा-श/
यात शेती पिकांच्या दृष्टीने येणाऱ्या समस्या, त्यावर उपाययोजना तसेच जास्त उत्पादन घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, उच्च जातीच्या बियाणांचा वापर, फळबाग लागवड इत्यादीचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषिदूत म्हणून संकेत कुलकर्णी, आदित्य फाटे,श्रेयांश गारे, आदित्य कांबळे, पार्थ कवडे व ओंकार शिवशरण यांचा सहभाग असणार आहे. पुढील तीन महिन्यांसाठी कृषिदूत या गावात राहणार आहेत.
यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर.संते, कार्यक्रम समनव्यक प्रा. एस.एस.मोटे, तसेच संबंधित विषयातील विषय विशेष तज्ज्ञ डॉ.एल.एस.व्यवहारे,प्रा.के.आर.भोकरे, डॉ.आर.एस.शेलार,प्रा.आर.बी.ढोले,प्रा.के.एम.पुजारी,प्रा.एस.आर.पाटनकर,प्रा.आर.जे.किल्लेदार,प्रा.पी.एन.गावकर,प्रा.एन.एच.लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिदूत आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.