रत्नागिरी– रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. अमित शहा यांची २४ एप्रिल रोजी रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम मैदानावर सभा होणार असल्याची माहिती बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत दिली. https://sindhudurgsamachar.in/kokan-जिल्ह्यात-5-6-7-मे-व-4-जून-रोजी/
महायुती उमेदवाराचा तिढा अद्याप कायम असला तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचाच प्रचार सुरू आहे.आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे आणि त्यादृष्टीने प्रचार सुरू असल्याचे ना. रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. महायुतीचा उमेदवार १८ तारीखला घोषित होईल असे संकेत त्यांनी यावेळी दिले.