उपसरपंचांचा इशारा: विद्युत वाहिन्यांवरील झाडी तोडा अन्यथा उपोषण
दोडामार्ग,ता.२०-: दोडामार्ग तालुक्यातील टोकाचे गाव असलेल्या केर भेकुर्लीचा परिसर अंधारात आहे. या परिसराचा बहुतांश भाग जंगलव्याप्त आहे. त्यामुळे विद्युत वाहिन्यांना लगडलेली झाडी मे महिन्यात साफ करावी अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांनी केली होती पण पावसाळा सुरु झाल्यानंतरही याकडे लक्ष न दिल्याने चार दिवसांपासून केर – भेकुर्ली परिसर अंधारात आहे. त्यामुळे जर येत्या आठ दिवसांत विद्युत वाहिन्या झाडीमुक्त न केल्यास कोणत्याही क्षणी उपोषण करण्याचा इशारा केर – भेकुर्ली ग्रामस्थांच्यावतीने उपसरपंच तेजस देसाई यांनी दिला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-दक्ष-महिला-पोलिसांची-गुन/
बहुतांश भाग जंगलव्याप्त आहे.त्यामुळे विद्युत वाहिन्याना लगडलेली झाडी मे महिन्यात साफ करावी अशी मागणी सातत्याने करूनही याकडे लक्ष न दिल्याने चार दिवसांपासून केर – भेकुर्ली परिसर अंधारात आहे. त्यामुळे जर येत्या आठ दिवसांत विद्युत वाहिन्या झाडीमुक्त न केल्यास कोणत्याही क्षणी उपोषण करण्याचा इशारा केर – भेकुर्ली ग्रामस्थांच्यावतीने उपसरपंच तेजस देसाई यांनी दिला आहे.


