⭐ कालवी महसूल या गावासाठी पोलीस पाटील पदी सौ.मृणाली सहदेव राऊळ यांची नियुक्ती
वेंगुर्ले:-(आबा खवणेकर): केळुस महसूल गाव व कालवीबंदर महसूल गाव या दोन्ही वेगवेगळ्या गावासाठी आता दोन पोलीस पाटील देण्यात आले आहेत.केळुस महसूल गावच्या पोलीस पाटील पदी कु.गौरी शंकर केळुसकर हिची निवड करण्यात आली आहे. तर कालवी या महसूल गावच्या पोलीस पाटील पदी सौ.मृणाली सहदेव राऊळ हिची निवड करण्यात आली आहे.आज वेंगुर्ले तहसीलदार कार्यालयात तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दोघांनाही नियुक्तीपत्र दिली आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-अंजनारी-ते-वाटुळ-या-मुंब/
केळुस मधलीवाडी येथे गरिब घराण्यात जन्मलेली कु.गौरी शंकर केळुसकर हिची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची व हलाखीची आहे.तर तीचे वडिल शंकर वामन केळुसकर यांचे काही महिन्यां पुर्वी निधन झाले आहे.अजून वर्ष झालेली नाही.तिच्यावर दुःखाचे सावट पसरले आहे.गौरी ही आपल्या आई सोबत एका खोलीत राहते.तसेच दुसर्या खोलीत तीचा चुलता रमेश वामन केळुसकर हे आपल्या परिवारासह एका खोलीत वेगवेगळे राहतात.त्यांचीही परिस्थितीही गरिब आहे.अशा गरिबीत राहुन तीने आपले १२ वी पर्यत शिक्षण पुर्ण केले.तसेच तीने आयटीआय टेलरिंगचा कोर्स पुर्ण केला आहे.आज केळुस महसूल गावच्या पोलीस पाटील पदी कु.गौरीची निवड झाल्याने सर्वत्र तीचे अभिनंदन होत आहे.