वेंगुर्ला प्रतिनिधी- नवतरुण उत्साही नाट्यमंडळ केळुस-कालवीबंदर यांनी सलग २० व्या वर्षी आयोजित केलेल्या सामाजिक नाट्य स्पर्धेत वेंगुर्ला-आसोलीच्या नारायणश्रीत नाट्य मंडळाच्या ‘वडाची साल पिंपळाक‘ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना रोख रुपये २० हजार व फिरता चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन गावचे पुरोहित रविद्र आरांदेवकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. यावेळी केळुस सरपंच योगेश शेट्ये, मनोहर पावसकर, आपा ताम्हणकर, भास्कर केळुसकर, शेखर राऊळ, केळुस मच्छीमार संस्थेचे चेअरमन दादू केळुसकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे सांघिक प्रथम- वडाची साल पिंपळाक (नारायणश्रीत नाट्यमंडळ आसोली), द्वितीय- कोर्टात खेचीन (अमर जवान क्रिएशन नेतर्डे-बांदा) तृतीय-गावय (मधलावाडा ग्रामस्थ सभा यशवंत बालनाट्य मंडळ आचरा-पिरावाडी)
दिग्दर्शन-प्रथम-शेखर गवस (कोर्टात खेचिन), द्वितीय-‘गावय‘ (आचरा-पिरावाडी), तृतीय-संदीप धुरी, अमित गावडे (वडाची साल पिंपळाक),
पार्श्वसंगीत-प्रथम मंदार आरोंदेकर (इंद्रधनू कलामंच दाभोली), द्वितीय- चेतन चेंदवणकर (आचरा), तृतीय- वामन धुरी (नारायणश्रीत नाट्यमंडळ, आसोली)
प्रकाशयोजना- प्रथम-गणेश आरोंदेकर (इंद्रधनू कलामंच दाभोली), द्वितीय-श्रीकांत चेंदवणकर, (नारायणश्रीत नाट्यमंडळ, आसोली), तृतीय-ऋषिकेश कोरडे (अमर जवान क्रिएशन नेतर्डे बांदा).
नेपथ्य-प्रथम-दादा हळदणकर (नारायणश्रीत नाट्यमंडळ, आसोली), द्वितीय-दिगंबर सुतार (अमर जवान क्रिएशन नेतर्डे बांदा).
पुरुष अभिनय-प्रथम-शुभम जाधव (अमर जवान क्रिएशन नेतर्डे बांदा), द्वितीय-दत्तप्रसाद कांबळी (मधलावाडा ग्रामस्थ सभा यशवंत बालनाट्य मंडळ आचरा-पिरावाडी), तृतीय-संजय नागडे (इंद्रधनू कला मंच,दाभोली),
स्त्री अभिनय-प्रथम- वैभवी सोकटे-परूळकर (इंद्रधनू कला मंच दाभोली), द्वितीय-मनस्वी जाधव (अमर जवान क्रिएशन नेतर्डे बांदा), तृतीय- निर्मला टिकम (इंद्रधनू कला मंच दाभोली)
परिक्षक म्हणून लेखक प्रविण शांताराम व नाटककार नंदू तळवलकर यांनी काम पाहिले. विजेत्यांना मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते दाजी केळुसकर, केळुस सरपंच योगेश शेटये, वायंगणी सरपंच अविनाश दुतोंडकर, मिलिंद पराडकर, परीक्षक नंदू तळवलकर, प्रविण शांताराम, मंडळाचे अध्यक्ष आपा ताम्हणकर, सचिव कृष्णा रेवणकर, उपाध्यक्ष महेश नार्वेकर यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देवून गौरविण्यात आले.
दरम्यान, वैभवी सोकटे-परूळकर यांनी याआधीही ब-याच सामाजिक नाटकांमध्ये काम करून पारितोषिके पटकाविली आहेत. कालवीबंदर येथे स्त्री अभियनासाठी प्रथम क्रमांक मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फोटोओळी – वेंगुर्ला-आसोलीच्या नारायणश्रीत नाट्य मंडळाच्या ‘वडाची साल पिंपळाक‘ या नाटकाला प्रथम क्रमांकाचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे मतदान ज