⭐अन्यथा पावसाळ्यात पाण्यात उतरलेल्या करंटमुळे जिवीत हानी होऊ शकते.
वेंगुर्ले – केळूस ते आंदुर्ले पिंपळ मार्गाचे डांबरी करणाचे काम चालू आहे याच मार्गात महावितरण कंपनीचा उच्चदाब विद्युत वाहक पोल असल्याने तो त्वरीत हटवणे गरजेचा आहे.कारण हा भाग सखल असून मळे शेतीचा भाग आहे. पावसाळ्यात नदीलापुर आल्याने या भागात पाणी वाढून बहुतेक वेळा रोडवर पाणी वाहत असते . त्यावेळी पाण्यातून ग्रामस्थ ये जा करतात अशावेळी कदाचीत पाण्यात करंट उतरल्यास शाॅक बसून जिवित हानी होऊ शकते त्या मुळे डांबरी करण पुर्ण होण्यापुर्वी सदरचा विद्युत वाहक पोल ची जागा बदलणे गरजेचे असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणने आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-केंद्रीय-मंत्री-नारायण-र-2/