🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला l प्रतिनिधी
केळूस ग्रामपंचायतीच्या हद्दीतील केळूस मोबार प्र. जि. मा. ४४ रस्त्यावरील आंदुर्ले पिंपळ ते केळूस तिठा ते मोबार रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी केळूस सरपंच श्री. योगेश शेटये व त्यांच्या सहकारी सदस्यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग वेंगुर्ले यांच्या माध्यमातून साफ करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-मुख्यमंत्री-स्वच्छ-व-सुं/
यापूर्वी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या रस्त्यावरील झाडी साफ करण्यात आली होती पण दिवळीपर्यंत पडलेल्या पावसामुळे या रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा झाडी वाढलेली होती. याबाबत केळूस सरपंच श्री. योगेश शेटये व त्यांच्या सहकारी सदस्यांच्या प्रयत्नांनी ह्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी पुन्हा साफ करण्यात आली. त्यामुळे वाहनधारक, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह