⭐नवीन टान्सफार्मर कार्यान्वित करा ; उपसरपंच संदीप पाटील यांची मागणी
सावंतवाडी ता.०९-: केसरी – धनगरवाडीत कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने सध्या कडाक्याच्या उन्हाळ्यात धनगर बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या वाडीत नविन ट्रान्सफार्मर मंजूर आहे मात्र त्याचे काम गेले तीन महिने प्रलंबित आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून याची तात्काळ दखल घेऊन हा ट्रान्सफॉर्मर त्वरित कार्यान्वित करावा अशी मागणी केसरी उपसरपंच संदीप पाटील यांनी केली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-अक्षय्य-तृतीयेच्या-हार्/