दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कोंगळे या शाळेने नुकतीच पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केली. शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व मुंबई मंडळ तसेच माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून नुकताच विविध उपक्रमांचे आयोजन करून कोंगळे शाळेत अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/कणकवली-तालुक्यातील-चक्री/
अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त कोंगळे शाळेत विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. अमृतमहोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमात शाळेतील शिक्षक, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी आदींचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश साळवी, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत बाईत, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष महेश साळवी, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाडवी, शाळेतील शिक्षक हनुमंत गरंडे, प्रियांका वसावे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात कोंगळे शाळेत सेवा बजावलेल्या व सध्या इतर शाळेत कार्यरत असलेल्या अनिल आंजर्लेकर, घाणेकर, वारे, बाबू घाडीगांवकर, महेश गिम्हवणेकर, सुनील गुरव यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद साळवी, नामदेव साळवी, राकेश साळवी, अविनाश मोहित, कुणाल मोहित, यांनी केले तर हनुमंत गरंडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.