Kokan : कोकणकन्या सुपरफास्टचे बुकिंग सुरू

0
38
कोकणकन्या सुपरफास्ट बुकिंग सुरू

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

कणकवली- कोकण रेल्‍वे मार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या एक्‍सप्रेसचा दर्जा वाढवून सुपरफास्ट करण्यात आल्‍यानंतर स्लीपर श्रेणीच्या तिकीटांत ३० रूपयांची वाढ झाली आहे. २० जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या सुपरफास्ट नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. त्‍या गाडीच्या बुकिंगला आजपासून प्रारंभ झाला. कोकणकन्या या गाडीला २० जानेवारीपासून एक्‍सप्रेस श्रेणीतून सुपरफास्ट श्रेणीत बढती मिळणार आहे. त्‍यामुळे २० जानेवारीपासूनचे बुकिंग बंद ठेवले होते. तारीख २२ सप्टेंबर पासून २० जानेवारी आणि त्‍यापुढील तारखांचे बुकिंग सुरू करण्यात आले. यात स्लीपर श्रेणीच्या तिकीट दरात ३० रूपयांची वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here