Kokan: कोकणातील हापूसची उपलब्धता कमी झाल्याने इतर आंब्याकडे ग्राहकांचा कल

0
65

मुबंई- एपीएमसी बाजारात सध्या कोकणातील हापूसची आवक कमी होत असून इतर राज्यातील आंब्याची आवक वाढत आहे. बाजारात हापूस मागणीच्या तुलनेत कमी उपलब्ध होत असल्याने इतर राज्यातील आंबा खरेदीला ग्राहकांचा कल वाढत आहे. यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत हापूसची आवक वाढली होती.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-नमो-आवास-योजनेअंतर्गत-10/

सोमवारी बाजारात कोकणातील ३१ हजार ९० पेट्या तर इतर राज्यातील ४८ हजार ४९६ पेट्या दाखल झाल्या आहेत. इतर राज्यातील आंब्याच्या तुलनेत कोकणातील आवक कमी होत आहे. एपीएमसीत प्रति डझन हापूसला ४००-१०००रुपये तर ४-६ डझन पेटी २ हजार ते ४ हजार ५००रुपयांनी विक्री होत आहे. तेच मागील वर्षी एप्रिलमध्ये यंदाच्या तुलनेत हापूसचे दर २०० ते ५००रुपयांनी कमी होते. दर चढेच असल्याने ग्राहकांनी आपला मोर्चा आवाक्यात असणाऱ्या कर्नाटक हापूस आंब्याकडे तसेच इतर आंबा खरेदीकडे वळविला आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत इतर राज्यातील आंब्याची आवक जादा असून ही १५-२०रुपयांनी अधिक दराने विक्री होत आहेत. हे आंबे प्रतिकिलो ८०-१४०रुपयांनी विकले जात आहेत.

आताही अवकाळी पाऊस,लहरी हवामानाने हापूसला फटका बसला आहे. त्यामुळे आवक कमी झाली आहे. मे मध्ये आवक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, परंतु ते गणितसुद्धा हवामानावर अवलंबून असल्याचे मत बागयदार यांच्याकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here