Kokan: कोकणात पहिल्याच मुसळधार पावसाचा राष्ट्रीय महामार्गाला फटका

0
135
परशुराम घाट, महामार्ग,
पहिल्याच पावसात परशुराम घाटात महामार्गावर आले दगड परिसरातील ६० ते ७० घरांना दरडीचा धोका कायम

चिपळूण : कोकणात पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाला फटका बसला आहे. चिपळूण शहरात अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झालं आहे. तर महत्त्वाच्या असलेल्या परशुराम घाटात किरकोळ स्वरूपाचे दगड महामार्गावर काल शनिवारी खाली कोसळले होते. सुदैवाने एक गाडी याच्यातून बचावल्याची माहिती परशुराम घाट येथील काही स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-केसरकरांच्या-वक्तव्या/

परशुराम घाटातील एक लेन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी या पावसातही परशुराम घाट धोकादायक ठरण्याची चिन्ह पहिल्याच पावसात दिसू लागली आहेत. इतकेच नव्हे तर या परिसरातील ६० ते ७० घरांना दरडीचा धोका कायम असून “भय इथले संपत नाही…” अशीच या वर्षीचीही स्थिती आहे. दरम्यान, या ठिकाणी चिपळूण पोलीस उपवागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी शनिवारी घटनास्थळी परिसराला भेट दिली. यावेळी, घाटात सुरक्षेचा उपाय म्हणून सगळ्या यंत्रणा सज्ज ठेवण्यात याव्यात, अशा सूचना सबंधित कंपनी प्रशासनाला दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here