सिंधुदुर्ग– तापमानाने छत्तीशी गाठली असताना कोकण किनारपट्टी भागात वार्याची चक्रीय स्थिती कायम आहे. किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने कोकण किनारपट्टीवर आगामी दोन दिवस वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या वातावरणीय बदलाने प्रभावित होऊन रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. https://youtu.be/7HLqXU3-c_g
तापमानाने अंगाची लाहीलाही होत असताना समुद्र सपाटीपासून तीन किमी अंतरावर चक्राकारवार्याची स्थिती कायम आहे. तसेच किनारपट्टी भागात ९०० मीटर अंतरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने आगामी दोन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे. आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, मार्फत करण्यात आले आहे.


