Kokan: कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल, आयोगाकडून मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

0
93
निवडणुक,आचारसंहिता
राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

रत्नागिरी– कोकण पदवीधर मतदारसंघाची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे. त्या अनुषंगाने आता २०२४ साली होणाऱ्या संभाव्य निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना येत्या ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २०१८ साली झाली होती. त्यामुळे आता मुदत संपत आल्याने त्यापूर्वी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या याद्या अद्यावत करतानाच पदवीधर नवीन मतदारांना नाव नोंदविता येणार आहे. त्यासाठी १८ क्रमांकाचा फाॅर्म भरून मतदार नाव नोंदवू शकतात. यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मतदारांना आपले नाव कोकण पदवीधर मतदार यादीत नोंदविता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here