- कोकणात चांगले उद्योग यावेत, प्रदूषणमुक्त उद्योग यावेत.
- गोवा राज्य फक्त पर्यटनावर सुरु आहे मग आपला रत्नागिरी-सिंधुदुर्ग का नाही ?
- परदेशी पर्यटक आले कि आपल्या काही लोकांचं पालुपद असतं कि ‘संस्कृतीवर घाला येतो. संस्कृती बिघडेल’ वगैरे. दोन वेळेचं अन्न देऊ शकत नाही अशी कोणती संस्कृती. आपल्याच मुलांच्या हाताला रोजगार मिळेल. आपल्या लोकांच्या हाती पैसे येईल.
- परदेशी पर्यटक आल्याने गोव्याची, केरळची संस्कृती बिघडली का? तिथली संस्कृती रसातळाला गेली का? नाही. पर्यटक येतील, आपल्या प्रदेशाचा आनंद घेतील, चांगले पैसे इथे खर्च करतील आणि जातील.
- मी मलेशियाला गेलो होतो. मलेशिया हा मुस्लिम देश आहे. मुस्लिमांमध्ये दारू पिणं आणि जुगार खेळणं वर्ज्य मानलं जातं. तिथे जेंटिंग हाईलँड्स म्हणून एक ठिकाण आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर दारू आणि कसिनोचा आनंद घ्यायला लोकं येतात. आम्हीही तिथे गेलो पण मला जुगार खेळात येत नाही फक्त ५ वर्षातून एकदा जुगार खेळतो.- मलेशियाच्या एका रेस्टोबारमध्ये एक पाटी दिसली ‘मुस्लिमांना प्रवेश नाही’. मी विचारपूस केली, तेव्हा कळलं. त्यांची धार्मिक मान्यता काहीही असली तरी पर्यटन आणि त्यातून आर्थिक सुबत्ता येणार असेल तर त्यांनी धर्म बाजूला ठेवला. मग आपण कोणती संस्कृती घेऊन बसलोय.
- गोवा, केरळ अशी बाकीची राज्य पुढे जात आहेत आपण तारकर्ली घेऊन बसलोय.
आपलं कोकण जैविविधतेने इतकं समृद्ध आणि सुंदर आहे की, जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेझॉन नंतर ह्या सह्याद्री पश्चिम घाटाची दखल घेतली जाते. आपल्याला त्याची जाणीवच नाही.
- माझी नारायणराव राणे ह्यांना विनंती आहे. जगातील – सुसज्ज हॉटेलची साखळी उभी करा. परदेशी पर्यटकांशी बोलायला इंग्लिश स्पिकिंग क्लासेस आणा.
- नारायणराव राणेंना मुख्यमंत्रीपदाचे फक्त ६ महिने मिळाले ते जर पुढची ५ वर्ष मिळाली असती ना तर कुणाला इथे प्रचाराला यायची गरजच लागली नसती. ते ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हा मलाही प्रश्न पडला होता कि मुख्यमंत्री पदाचा आवाका पाहता नारायणरावांना हे जमेल का? पण त्यांनी ज्याप्रकारे मुख्यमंत्रीपद हाकलं, हाताळलं ते भल्याभल्यांना नाही जमलं आहे.झपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल.
- मी, सन्मा. बाळासाहेब असे कधी गप्पांना बसायचो तेव्हा बाळासाहेब सांगायचे अंतुलेनंतर कुणी कामाचा वाघ बघितला असेन तर आपले नारायणराव राणे.
- एखादा विषय समजून घेणं आणि समजल्या नंतर तो मांडणं… ह्याचं एक उत्तम उदाहरण देतो. नारायणराव राणे विरोधी पक्षनेते होते तेव्हा माझे आजचे सहकारी अनिल शिदोरे एकेदिवशी सामाजिक कार्यकर्ते श्री. अभय बंगांना घेऊन त्यांना भेटले. श्री. बंगांनी बालमृत्यू, कुपोषण ह्या समस्येबद्दल नारायणरावांना माहिती दिली. दुसरी दिवशी सभागृहात नारायणरावांनी तो विषय ज्या विस्तृतपणे, अभ्यासपूर्ण तासभर मांडला त्यावर बालमृत्यू, कुपोषण प्रश्नावर काम करणारे अभय बंगही बेहद्द खुश होते. असा माणूस तुमच्यासमोर खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे.
- रत्नागिरी-सिंधुदुर्गवासियांना माझी विनंती आहे कि, तुम्हाला नुसताच बाकड्यावर बसणार खासदार पाहिजे कि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवून तळकोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे.
- कोकणाबद्दलची जी काही मतं आहेत, माझ्या ज्या कल्पना आहेत ते मी नारायणराव राणेंकडे घेऊन गेल्यावर ते चालढकल करणार नाहीत. त्या विषयांना न्याय देतील हा मला विश्वास आहे- माझा कोकणी माणूस आज उद्योग नाही, सुबत्ता नाही म्हणून कोकण सोडतो. त्या कोकणी माणसाला आपल्या कुटुंबापासून विभक्त व्हायची पुन्हा वेळ येणार नाही ह्यासाठी आम्ही काम करू.
- येत्या ७ मे ला, श्री. नारायणराव राणे ह्यांना प्रचंड मतांनी विजयी कराल, हि अपेक्षा मी बाळगतो