🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार अभिमन्यू वेंगुर्लेकर
नवरात्र व दसरोत्सव झाल्यानंतर लोकांना वेध लागतात ते कोजागरी पौर्णिमेचे ग्रामीण व शहरी भागातील तरुण मंडळी कोजागरी पौर्णिमेची वाट पाहत असतात आश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते चंद्राच्या शीतल प्रकाशात आणि चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली बसून मसाला दूध पीत काव्य,शास्त्र व विनोदाच्या आस्वादाची लयलूट याच दिवशी होते. कोजागरी पौर्णिमेसाठी लेखक,कवी,कवयत्री,गझलकार व नाट्य क्षेत्रातील कलाकारांबरोबर तरुण-तरुणी कोजागरी पौर्णिमेचा आस्वाद लुटण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येते आहेत https://sindhudurgsamachar.in/maharashtra-विधानसभेच्या-पार्श्वभ/
पावसाळा संपल्यानंतर कोजागरी ही पहिली पौर्णिमा येते आकाशात काळ्या कुट्ट ढगाळ वातावरणाचे साम्राज्य संपल्यानंतर या पौर्णिमाला येणारी चंद्राची किरणे मनाला सुखावतात त्यामुळेच या अल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दसऱ्यानंतर कोजागरी साजरी करतात. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ८५ हजार किलो मीटर अंतरावर आणि ९९.९९ टक्के म्हणजेच जवळपास पूर्ण प्रकाशित असतो. या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री को जागर्ति (कोण जागत आहे) असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे कोण जागे आहे याचा मतीतार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते. प्रत्येक ऋतूनुसार वातावरणात बदल होत असतात या बदलाला प्रतिसाद देण्यासाठी सणांची निर्मिती झाली असे म्हटले जाते त्यामुळे रोजच्या कामातून वेळ काढून नवरात्रोत्सव व दसरा याप्रमाणेच कोजागरीचाही आस्वाद घेण्यासाठी काव्य संमेलन, सुगम संगीत,कथाकथन,नाट्य अभिवाचन अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी करण्यात येते.
कोजागरी पौर्णिमा मसाला दूध…. या दिवशी दूध आटवून त्यात केशर,पिस्ते, बदाम,चारोळी,वेलदोडे,जायफळ,साखर वगैरे साहित्य घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची ‘आश्विनी’ साजरी करतात. नवान्न पौर्णिमा… निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नावान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते धान्याची एक प्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारावर व महत्त्वाच्या वस्तूंवर नवे बांधले जाते गावच्या परंपरेनुसार नवे हा विधी (कोकणात)कोजागरी पौर्णिमेच्या आधी सुद्धा होतो.