Kokan : कोल्हापूरचा पृथ्वीराज डांगे व नागपूरची संजना जोशी ठरले वेगवान जलतरणपटू

0
56
मालवणात राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा संपन्न

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

मालवणात राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा संपन्न

मालवण महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने आणि सिंधुदुर्ग जिल्हा हौशी जलतरण संघटना व मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणच्या चिवला बीचवर आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ५ किमी व ३ किमी अंतराच्या विविध गटातील जलतरण स्पर्धा संपन्न झाल्या. या सर्वांमधून ५ किमी अंतराच्या प्रमुख स्पर्धेत मुलांमधून वेगवान जलतरणपटूचा मान कोल्हापूरच्या पृथ्वीराज डांगे याने मिळविला. तर मुलींमधून नागपूरच्या संजना जोशी हिने वेगवान जलतरणपटूचा मान मिळविला. तर तीन किमी अंतराच्या स्पर्धेतून वेदांत गडाख व आरोही पालकडे यांनी वेगवान जलतरणपटूचा मान मिळविला. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत नागपूर, कोल्हापूर, ठाणे, बेळगाव, रायगड येथील स्पर्धकांनी आपले वर्चस्व राखले.https://sindhudurgsamachar.in/kokan-काजू-पीक-फळ-योजनेत-देणार-100/

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here