Kokan: खाजगी फायनान्स कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक; मनसे आक्रमक, गुन्हे दाखल करण्याची मागणी

0
72
खाजगी फायनान्स कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक,
खाजगी फायनान्स कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक; मनसे आक्रमक गुन्हे दाखल करण्याची मागणी

सुनिता भाईप / (सावंतवाडी)
सावंतवाडी- सावंतवाडी शहरात एका खाजगी फायनान्स कंपनीकडून अनेकांना कमी व्याज दरात एका महिन्याच्या आत विना जामीन कर्ज उपलब्ध करून देण्याच्या योजनेखाली अनेक ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली असून या योजनेमध्ये आर्थिक फसवणूक झालेल्या ग्राहकांनी मनसे कडे न्याय मिळवून देण्यासाठी भेट घेतली. कमी व्याज दराच्या आमिषाला भुलून अनेकांनी या योजनेत आपले पैसे गुंतविले. पैसे दिल्यानंतर एका महिन्याने कर्ज मिळणार या आशेमध्ये हे ग्राहक होते. मात्र या एजन्सी मार्फत देण्यात येणारे चेक न वटता बँकेकडून परत येत असल्याने हवादिल झालेल्या या ग्राहकांनी मनसे कडे धाव घेतली होती. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-तरुणांच्या-जिव/

दरम्यान मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर ,तालुका अध्यक्ष. मिलिंद सावंत , परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर ,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या नेत्रुत्वाखाली सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे भेट दिली व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या या फायनान्स कंपनीच्या सर्व जबाबदार कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून फसवणूक झालेल्या सर्व ग्राहकांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ , उपतालुका अध्यक्ष अतुल केसरकर ,सुनील आसवेकर उपशहर अध्यक्ष सिद्देश आकेरकर ,सतीश आकेरकर ,साहिल तळकटकर ,राकेश परब ,विष्णू वसकर, यांच्यासह फसवणूक झालेले ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here