कणकवली ता. ०९-: मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये प्रामुख्याने कणकवली तालुक्यातील खारेपाटण भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येथील मेडिकल, भूषारी दुकाने, हॉटेल्स, कापड दुकाने, बसस्थानक, मोबाईल शॉप, हार्डवेअर तसेच एका मंदिरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी आज खारेपाटण येथे भेट देउन नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. तसेच प्रशासकीय अधिकऱ्यांकडून देखील उद्भवलेल्या आपत्तीची माहिती घेतली. https://sindhudurgsamachar.in/kokan-विधानसभा-निवडणूकीसाठी-स/