देवगड: देवगड पोलीस ठाणे मध्ये दि.22/09/2023 रोजी सुधीर रघुनाथ पवार वय -44वर्षे, रा. कुवळे तर्फेवाडी ता. देवगड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबातची अधिक माहिती अशी कि तक्रारदार श्री. एकनाथ शंकर पवार वय -59 वर्षे, रा. कुवळे तर्फेवाडी ता. देवगड यांनी सदर आरोपी हा घरात गणपती सण चालू असताना दारू पिऊन आला. नशेमध्ये त्याने घरातील सर्व माणसांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊ लागला. म्हणून तक्रारदार हे त्यास समजावण्यासाठी गेले असता आरोपीने न्हाणी घरातील चुलीसाठी जमा करण्यात आलेले जंगली लाकूड त्यांचे डोकीवर मारून दुखापत केली. तसेच हाताच्या थापटाने पाठीवर मारून धकला बुकल करून घरातील माणसांना व तक्रारदार यांना ठार मारल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी देत शिवीगाळ केली .https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शासकीय-रुग्णालयातील-सर/
सुधीर रघुनाथ पवार यांच्यावर रजि.नं.141/2023 भा. द. वि. कलम -324,323,504,506 प्रमाणे दि.21/09/2023 रोजी गुन्हा तपास अंमलदार महाडिक, देवगड पो.ठाणे यांनी दाखल करून घेतला आहे .या प्रकरणाची माहिती दाखल करण्यात आला असल्याचे माहिती (एन.जी.बगळे)पोलीस निरीक्षक देवगड पोलीस ठाणेयांनी दिली आहे.