संगमेश्वर (प्रतिनिधी) : गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या कितीतरी पटींनी वाढते, हे लक्षात घेऊन यंदा गणेशोत्सवात कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेकडून दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच मेमू (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टियुनिट) स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकणात-पहिल्याच-मुसळधार/
१३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत रत्नागिरी स्थानकापर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी धावणार आहे. या गाडीच्या ३९ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी रोज धावणार आहे. सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ही गाडी दिवा स्थानकातून रत्नागिरीला ती दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल.