कुडाळ -मनोज देसाई
वालावल- हुमरमळा देसाईवाडी येथील रहिवाशी श्री. प्रकाश धोंडी तावडे यांच्या मालकीच्या गवताच्या गंजीला सोमवारी दुपारी आग लागली.यात गवतची गंजी , गुरांना तात्पुरत्या स्वरूपात उभारलेला गोठा(कवान), सरपणाची लाकडे, पाण्याचे पाईप, आदी जळुन खाक झाले. https://sindhudurgsamachar.in/kokan-वालावल-येथील-तलावाच्या-स/
तावडे कुटुंबीयांनी तत्परता दाखवल्याने गंजीच्या जवळच असलेल्या गोठ्यातील गायी आदी जनावरे आगीच्या ज्वालांपासुन बचावली, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. हुमरमळा वालवल (देसाई वाडी) येथे सदर घटनेची सविस्तर माहिती अशी, तावडे कुटुंबियांच्या घरा शेजारीच शेत जमीनीत गुरांचा गोठा आहे. गोठ्याच्या बाजुलाच सदर गवताची गंजी आहे. आज दुपारच्या वेळी सदर आग लागली. ती जळत- जळत गंजी पर्यंत आली. आवाज कसला म्हणून तावडे यानी पाहीले असता, आग लागल्याचे दिसले. सोमवार असल्याने लाईट नव्हती. त्यामुळे पंप असुनही त्याचा उपयोग झाला नाही. गवताच्या गंजीकडेचा उन्हाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या कवानात चार गुरं बाधली होती. प्रकाश तावडेंच्या कुटुंबीयांनी तत्परता दाखवत गुरांना सोडले. पण, त्यांच्या वरील कवान पुर्णपणे जळुन भस्मसात झाले.आगीच्या ज्वाळांनी बाजुची झाडे, पाण्याचे पाईप, तसेच सरपणाची लाकडे, वायर्स आदी जळाले.गंजीला आग लागल्याने गुरांच्या वैरणीची पंचायत झाली आहे. आग लागल्याचे समजताच , देसाई वाडीतील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, आदींनी धाव घेतली. तावडेंच्या घरासमोरच नळपाणी योजनेची टाकी आहे.मात्र , दुरुस्ती साठी ती उतरविण्यात आली आहे. या प्रसंगामुळे, तावडे यांचे सुमारे आठ- दहा हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण मात्र समजू शकलं नाही.