कणकवली:-खारेपाटण शिवाजीपेठ येथील अब्दुल गणी हाजी गफार मेमन याच्या गोडावूनमध्ये अवैध साठवणूक केलेला ५५,४६० रुपये किंमतीचा गुटखा व पानमसाला आढल्याप्रकरणी अटकेत असलेल्या श्री. मेमन याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला. श्री. मेमन याच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. https://sindhudurgsamachar.in/kokan-संजना-परब-मृत्यूप्रकरणी/
दि. १९ जानेवारी २०२४ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधारे पंचांसोबत ओरोस येथील अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांनी खारेपाटण शिवाजी पेठ येथील श्री. मेमन यांच्या गोडावूनवर छापा घातला. यात राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल पानमसाला व गुटखा असे मिळून ५५,४६० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी आरोपी मेमन याच्यावर भादंवि कलम ३२८, १८८, २७२, २७३ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम २६, ३०, ५९ अन्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी २८ मार्च २०२४ रोजी आरोपीला अटक केली होती. एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत होता.
आरोपीच्यावतीने जामिनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर सुनावणी होऊन ५० हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष साक्षी पुराव्यात ढवळाढवळ करू नये, याप्रकारचा गुन्हा पुन्हा करण्यात येऊ नये आदीं अटींवर जामिन मंजूर केला आहे.