Kokan: गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव

0
53
गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षका,
गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्या. शाखा दापोलीच्या वतीने दापोली येथील विशेष कार्यक्रमात दापोली तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या गुणवंत मुलांचा व सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांचा रोख रक्कम, शाल, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पतपेढीचे दापोली शाखेचे संचालक अशोक मळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पतपेढीचे माजी संचालक प्रविण काटकर, माजी अध्यक्ष सदाशिव रसाळ, माजी उपाध्यक्ष हनुमंत मोरे, मुकुंद कासारे, विजय फंड, इक्बाल फडणीस, शशिकांत तेटांबे, गुलाबराव गावीत, बाबू घाडीगांवकर, अर्जुन कांबळे, स्वप्नील परकाळे, रंजना परांजपे, पतपेढीचे दापोली शाखाप्रमुख अमित जोशी, लिपिक गजानन निमजे आदी मान्यवर उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-मानसी-सावंत-यांचा-गुणवंत/

रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी, पदवी व उच्च पदवी प्राप्त केलेले शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक यांचा सन्मान व सत्कार करण्यात येतो. पतपेढीच्या दापोली शाखेच्या वतीने दापोली येथील श्री मंगल कार्यालयात आयोजीत केलेल्या या कार्यक्रमासाठी तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. पतपेढीचे दापोली शाखेचे संचालक अशोक मळेकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षक व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्राथमिक शिक्षक पतपेढी ही प्राथमिक शिक्षकांसाठी ‘कामधेनु’ असून याच पतपेढीच्या मदतीने सर्व शिक्षक स्वतःची व परिवाराची प्रगती करीत आहेत असे अनेक मान्यवरांनी मत व्यक्त केले. हनुमंत मोरे, सदाशिव रसाळ, मुकुंद कासारे, विजय फंड यांनी पतपेढीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे व कल्याणकारी योजनांचे कौतुक केले. संचालक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक मळेकर यांनी प्राथमिक शिक्षक पतपेढी नेहमीच प्राथमिक शिक्षकांच्या कल्याणासाठी अग्रेसर राहील असे अध्यक्षीय भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव बोरकर व रामचंद्र थोरबोले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पथपेढीचे दापोली शाखाप्रमुख अमित जोशी, लिपिक गजानन निमजे, कर्मचारी मंगेश वाडकर यांनी परिश्रम घेतले.

  
   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here