Kokan: गोळवण- कुमामे-डिकवल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री.शरद मांजरेकर यांची नियुक्ती.

0
40
गोळवण- कुमामे-डिकवल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री.शरद मांजरेकर
गोळवण- कुमामे-डिकवल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री.शरद मांजरेकर यांची नियुक्ती.

गोळवण गोळवण गावच्या युवा, बेधडक नेतृत्वाची उपसरपंचपदी नियुक्ती. प्रशासकीय कारभाराचे व्यासंगी अभ्यासक असलेले, कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जाणारे तडफदार व्यक्तिमत्त्व, पंचक्रोशीत अबालवृद्धांचे मित्र, तरुणाईचा बुलंद आवाज गोळवण ग्रामपंचायत सदस्य श्री.शरद मांजरेकर गेली काही वर्षे सन्माननीय सरपंच श्री. सुभाष लाड यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकी जपत गोळवणच्या विकासाची विधायक कार्य करीत आहेत. तळागाळातील लोकांपर्यंत आत्मियता जप्त त्यांच्या समस्या जाणून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत अनेक धाडसी प्रकल्प सुरू करुन गोळवणच्या विकासाची गती वेगवान केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-काव्योत्सवात-अवतरणार-क/

शरद मांजरेकर यांनी माणुसकी जपत सामान्य रिक्षावाला ते उपसरपंच असा प्रवास करत गोळवणच्या विकासाची ध्येये हाती घेतली आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा सुरुवातीला रिक्षा व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्य करीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले.शरद मांजरेकर यांनी सुद्धा जनसामान्यांच्या प्रश्नाना वाचा फोडत गोळवण गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहुन सामाजिक बांधिलकीने कार्य करीत आहेत. मंगळवार दिनांक ०७/११/२०२३ रोजी दुपारी २.०० वा. ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल ची उपसरपंच निवड सभा घेण्यात आली. सदर वेळी उपसरपंच पदाचे उमेदवार श्री. शरद राजाराम मांजरेकर यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी जिल्हा बँक संचालक श्री. बाबा परब साहेब, भाजपा तालुका अध्यक्ष श्री. धोंडी चिंदरकर साहेब, भाजपा तालुका सरचिटणीस श्री. महेश मांजरेकर, नांदोस उपसरपंच श्री. विजय निकम, नांदोस ग्रामस्थ श्री. नितीन नांदोसकर, ग्रा.पं. गोळवण-कुमामे-डिकवल चे सरपंच मा. श्री. सुभाष लाड, ग्रा. पं. सदस्य श्री. साबाजी गावडे, श्री. विरेश पवार, सौ. विभा परब, सौ. शिल्पा तेली, सौ. मेघा गावडे, श्रीम. एकादशी गावडे, सौ. प्राजक्ता चिरमुले, तसेच गाव गोळवण, कुमामे व डिकवल येथील ग्रामस्थ श्री. अभिमन्यू गावडे, श्री. विकास परब, श्री. मुरारी गावडे, श्री. सतीश तेली, श्री. मनोज चव्हाण, श्री. श्रीकृष्ण तेली, श्री. शंकर गावडे, श्री. संजय पाताडे, श्री. रामचंद्र घाडी, श्री. नंदादीप नाईक, श्री. रामकृष्ण नाईक, श्री. सुहास घाडी, श्री. प्रकाश चिरमुले, श्री. संदेश पवार, श्री. नामदेव वरक, श्री. संतोष चव्हाण, श्री. अजित गोळवणकर, ग्रामसेवक श्रीम. अर्पिता शेलटकर, ग्रा.पं. कर्मचारी श्री. बाळाराम परब, श्रीम. करुणा राणे, श्री. दत्ताराम परब आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here