
⭐तर दक्ष जाधव हा १० वर्षाचा मुलगा कणकवली येथील विद्या मंदिर हायस्कूल मध्ये इयत्ता ४ थी मध्ये शिकत होता.तो एकुलता एक होता. ⭐कणकवलीसह हळवल गावात पसरली शोककळा ⭐दरम्यान त्या मुलाच्या आईची तब्येत सुधारत असून,तीला गोव्यातून डिस्चार्ज देण्यात आला असून,तीला शुक्रवारी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिंधुदुर्ग:-(आबा खवणेकर):-गुरूवारी रात्री ७-४० च्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली येथील गडनदी पुलावर भरधाव वेगात असलेल्या ट्रक चालकाने हळवलकडे जाणाऱ्या दुचाकीला उडवले होते. यात दुचाकीवरील हळवल येथील महिला सोनाली जाधव (वय वर्षे ३०) व तीचा मुलगा दक्ष जाधव (वय वर्षे १०) हे दोघेजण गंभीर जखमी झाले होते.त्यांना कणकवलीतील नागवेकर यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार करून तब्बल ५ तासाने रात्री १ च्या सुमारास गोवा बांबुळी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु सोनाली जाधव यांची प्रकृती चांगली असल्याने त्यांना शुक्रवारी घरी पाठवण्यात आले तर त्यांच्या हाताला व पाठीवर लागल्याने घरातील लोकांनी त्यांना कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.तर त्यांचा मुलगा दक्ष याच्यावर गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचे ऑपरेशनही सक्सेस फुल झाले होते. तब्बल ४८ तासांत म्हणजेच शुक्रवारी रात्री ७-४० च्या सुमारास त्याचे निधन झाले आहे. त्याचा मृतदेह आज शनिवारी दुपारनंतर कणकवली येथील हळवल येथे आणण्यात येणार आहे. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/