Kokan: ग्रंथदिडीने बालकुमार साहित्य संमेलनाला प्रारंभ

0
78
ग्रंथदिडीने बालकुमार साहित्य संमेलनाला प्रारंभ
ग्रंथदिडीने बालकुमार साहित्य संमेलनाला प्रारंभ

वेंगुर्ला प्रतिनिधी- नवांकूर बालकुमार साहित्य संमेलनासारखे स्तुत्य उपक्रम होणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना साहित्याविषयी आवड निर्माण होईल. आनंदयात्री वाङ्मय मंडळ विविध उपक्रम घेऊन जनमानसात साहित्याविषयी  प्रसार आणि प्रचार करीत आहेत. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-स्टार-स्पोर्ट्सच्या-प्/

आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे तुळस येथे नवांकूर बालकुमार साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला आहे. याची सुरूवात २२ डिसेंबर रोजी भव्य ग्रंथदिडीने झाली. जैतिर मंदिर ते शिवाजी हायस्कूलपर्यंत काढण्यात आलेल्या ग्रंथदिडीचे उद्घाटन मनिष दळवी यांच्या हस्ते झाले. आनंदयात्रीच्या अशा कार्यक्रमांमधून भविष्यात साहित्यिक निर्माण होतील असे बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनी सांगितले. या ग्रंथदिडीमध्ये श्री शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझिम व वारकरी नृत्य करून रंगत आणली. तर विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेने लक्ष वेधून घेतले.

या ग्रंथदिडीत सरपंच रश्मी परब, वाचनालयाचे अध्यक्ष सगुण माळकर, प्रकाश परब, कृष्णा तावडे, जयवंत तुळसकर, नारायण कुंभार, मंगेश सावंत, सद्गुरू सावंत, हायस्कूलचे मुख्याध्यापक अॅन्थोनी डिसोझा, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्रा.विवेक चव्हाण, अजित राऊळ, निवृत्त पोलीस सुधिर चुडजी, माधव तुळसकर, किरण राऊळ, सागर सावंत, विवेक तिरोडकर, माधव तुळसकर, पि.के.कुबल, संजय पाटील, महेश राऊळ, अॅड.चैतन्य दळवी, चारूशीला दळवी, माधवी मातोंडकर, हायस्कूलचे सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

फोटोओळी – नवांकूर बालकुमार साहित्य संमेलनांतर्गत ग्रंथदिडीचे उद्घाटन मनिष दळवी यांच्या हस्ते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here