Kokan: ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान अधिकारी रवाना

0
81
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान अधिकारी रवाना

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यात रविवारी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावर शनिवारी तहसिलदार प्रविण लोकरे यांच्या नेतृत्वाखाली मतदान अधिकारी रवाना झाले. यावेळी महसूल नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पहिली एसटी सोडण्यात आली.     https://sindhudurgsamachar.in/kokan-अणसूर-येथे-मोफत-इंग्लिश/

यावेळी धनंजय सिंगनाथ, परुळे तलाठी कुडतरकर, रावदस तलाठी गायकवाड, मोचेमाड तलाठी बोरकर, पुरवठा अधिकारी गणेश पाटील, मठ तलाठी गोते, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

फोटोओळी – मतदान अधिका-यांना घेऊन जाणा-या एसटींचा शुभारंभ महसूल नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here