🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l म्हापण l संदिप चव्हाण –
ग्रामपंचायत म्हापण कार्यकारिणीच्या द्वितीय वर्ष पूर्ती निमित्ताने ग्रामपंचायत सभागृह येथे रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.’रक्तदान हेच जीवनदान रक्त दान हेच श्रेष्ठ दान’ मानत २६ रक्तदात्यांनी या वेळी रक्तदान केले.या रक्तदान शिबिरात आकाश फीश मिल अँण्ड फिश ऑइल केळूसच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.तर डॉ.गद्रे रुग्णालय वेंगुर्ले, महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत ३६ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.या वेळी मोतीबिंदू, डोळ्यांच्या शस्त्रक्रिये, डोळ्यांच्या आजारा विषयी डॉ.उदय दाभोलकर यांच्या कडून अधिक माहिती रुग्णांना देण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
आयोजित रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच आकांक्षा चव्हाण यांच्या हस्ते पार पडले.यावेळी उपसरपंच सुरेश ठाकूर, ग्रामपंचायत अधिकारी तुषार हळदणकर,माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ मडवळ, सदस्या सिया मार्गी, प्रशांती कोनकर, सुषमा म्हापणकर, तन्वी चौधरी, विश्वनाथ म्हापणकर,माजी शिक्षण व आरोग्य सभापती विकास गवंडे,सिध्देश मार्गी, प्रदिप गवंडे, रघुनाथ उर्फ दाजी जुवाटकर, श्रीमती सकरे, सावळाराम म्हापणकर,धान्य दुकानचे गुरुनाथ मार्गी, कोतवाल मनोहर घाडी, जगू म्हापणकर, अंगणवाडी सेविका,रक्तदाते, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी नेत्र तपासणी संपूर्ण टीमचे तसेच रक्तदान शिबिरात मोलाचे सहकार्य लाभलेल्या जिल्हा ब्लड बँकेच्या स्टापचे ग्रामपंचायत वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.तसेच उपस्थित मान्यवरांचे देखील स्वागत यावेळी करण्यात आले.
ग्रामपंचायत वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत आहे.त्यामुळे या रक्तदान शिबिरामुळे गरजू रुग्णांना त्याचा फायदा होईल. हे रक्तदान शिबिर सकाळी ९.३० ते १ वाजेपर्यत पार पडले.या रक्तदान शिबिराला जिल्हा ब्लड बँकचे डॉ.पवण लोखंडे, प्रांजली परब, कांचन परब, ऋतुजा हरमलकर, नंदकुमार आडकर, नितीन गावकर , प्रविण परब आरोग्य सेविक म्हापण तसेच नेत्र तपासणीसाठी आलेले डॉ.उदय दाभोलकर, विशाल आजगावकर,रमिता गावडे,दिव्या राऊळ , अविनाश ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या क्षेत्रात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रघुनाथ उर्फ दाजी जुवाटकर यांनी मानले.