Kokan: घरकुलांची नोंदणी आता आवास सॉफ्ट प्रणालीमध्ये

0
46
आवास सॉफ्ट प्रणाली
रकुलांची नोंदणी आता आवास सॉफ्ट प्रणालीमध्ये

रत्नागिरी- प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी राज्यात केंद्र व राज्य पुरस्कृत घरकूल योजना राबविण्यात येतात . मोदी आवास योजना , यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व अहिल्याबाई होळकर धनगर वस्ती योजना या योजनेतून अधिकाधिक नागरिकांना घरकूल मिळाली पाहिजेत . यासाठी या योजने अंतर्गत करण्यात येणारी पात्र घरकुलांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . यासाठी पात्र लाभार्थ्यांची केंद्राच्या आवास सॉफ्ट या संगणक प्रणालीत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .https://sindhudurgsamachar.in/goa-गोव्यात-मेघगर्जनेसह-मुस/

केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे . लाभार्थ्यांची केंद्र सरकारच्या आवास सॉफ्ट या संगणक प्रणालीमध्ये नोंदणी करण्यात येणार आहे . या सर्व योजनांमधील प्रलंबित व अपूर्ण असलेली घरबांधणी कामे तातडीने पूर्ण करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे . दरम्यान , या वर्षी पात्र लाभार्थ्यांना तीन लाख घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे . या लाभार्थ्यांना वेळेत घरकुल मिळण्यासाठी व दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या प्रणालीमध्ये नोंदणी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here