Kokan: चंद्रनगरच्या चांद्रयान-3 ची उत्तुंग भरारी

0
172
चंद्रनगरच्या चांद्रयान-3 ची उत्तुंग भरारी
चंद्रनगरच्या चांद्रयान-3 ची उत्तुंग भरारी

दापोली- १४ जुलै २०२३ रोजी इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने चांद्रयान-3 या मानवरहीत अवकाशयानाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. भारतीय अवकाश संशोधकांच्या कार्यातून प्रेरणा घेत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर या शाळेतील तब्बल पंधरा विद्यार्थ्यांनी चांद्रयान-3 ची सुंदर प्रतिकृती बनवून एक प्रकारे उत्तुंग अवकाश झेपच घेतली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-मणिपूर-येथील-स्त्रियांच/

चंद्रनगर शाळेतील शिक्षक बाबू घाडीगांवकर, अर्चना सावंत, मनोज वेदक, मानसी सावंत व पालकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शमिका मुलूख, वेदिका मुलूख, पुर्वा जगदाळे, वेदांत शिगवण, आयुष मिसाळ, प्रसाद शिगवण, दीप शिगवण, श्रेयश मुळे, श्रावणी कोळंबे, विराज मुलूख, अथर्व रांगले, इशांत पागडे, वैष्णवी आंबेलकर, मंजिरी पवार, दिया मुलूख या विद्यार्थ्यांनी चांद्रयान- 3 ची प्रतिकृती तयार केली आहे. गत वर्षापासून रत्नागिरी जिल्हा परिषदेने ‘ नासा- इस्रोस विद्यार्थी भेट ‘ हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत होणाऱ्या चाळणी परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची व अवकाश संशोधनाची आवड व कुतुहल निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी चंद्रनगर शाळेच्याच आयुर मुलूख या विद्यार्थ्याची इस्रो भेटीसाठी निवड झाली होती. या विद्यार्थ्याच्या यशापासून प्रेरणा घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांनी चांद्रयान-3 ची प्रतिकृती साकार केली आहे.

चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर आदी अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. चंद्रनगर शाळेने राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे गिम्हवणे केंद्राचे केंद्र प्रमुख सुनिल कारखेले, दापोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, दापोली पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनीही चंद्रनगर शाळेतील चांद्रयान-3 ची प्रतिकृती साकार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here