Kokan: चंद्रनगर शाळेत आजी – आजोबा दिवस साजरा

0
74
चंद्रनगर शाळेत आजी आजोबा दिवस साजरा
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेत नुकताच आजी आजोबा दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर व अनेक आजी आजोबा उपस्थित होते.

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेत नुकताच आजी आजोबा दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर व अनेक आजी आजोबा उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर यांचे हस्ते उपस्थित आजी आजोबांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/kokan-माजी-खासदार-निलेश-राणे-या/

या कार्यक्रमात शाळेतील सर्व मुलांनी त्यांच्या आजी आजोबांचे पदपुजन करून त्यांना पंचारतींनी ओवाळले. शाळेतील विद्यार्थीनी वेदिका मुलूख हिने आजी आजोबा व नातवंडांचे नाते अधिक घट्ट करणारी ‘ आजोबांचे हृदय ‘ ही बालकथा सादर केली. पुर्वा जगदाळे या मुलीने ‘ माझे आजी-आजोबा ‘ शीर्षकाची बालकविता सादर केली. इशांत पागडे याने आजी आजोबांचे महत्त्व विषद करणारे स्वरचित गीत सादर केले. यावेळी सौम्या बैकर, सांची मिसाळ, आरोही मुलूख, अंगणवाडी सेविका आशा मुळे, शाळेतील विषय शिक्षिका मानसी सावंत, मुख्याध्यापिका अर्चना सावंत, रुपेश बैकर यांनी आजी आजोबा दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारे मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजी आजोबांनीही त्यांच्या नातवंडांप्रति असणाऱ्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. यावेळी सौम्या बैकर, सांची मिसाळ, श्रावणी कोळंबे, पुर्वा जगदाळे, दिया मुलूख, शमिका मुलूख, मंजिरी पवार, वेदिका मुलूख या मुलांनी आजी आजोबा दिनानिमित्त स्वरचित फुगडीगीत सादर केले. उपस्थित सर्व आजी आजोबांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक केले. या दिनानिमित्त शाळेत निबंधलेखन व चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. उपस्थित सर्व आजी आजोबा व मुलांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक बाबू घाडीगांवकर यांनी केले तर मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here