Kokan: चंद्रनगर शाळेत प्रजासत्ताक दिन

0
111
प्रजासत्ताक दिन
चंद्रनगर शाळेत प्रजासत्ताक दिन

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l दापोली-

दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राकेश शिगवण यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रुपेश बैकर, चंद्रनगरच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, उपसरपंच राजेंद्र मिसाळ, चंद्रनगर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्रीधर जाधव, शिक्षण कला क्रीडा संस्थेचे अध्यक्ष सदानंद मुलूख, हेल्थ ग्रुपचे सुनील रांगले, विजय मुलूख, शैलेश मुलूख, चंद्रकांत मुलूख, शंकर रांगले, पोलीस पाटील गौरी पागडे, ग्रामसेवक संदीप सकपाळ, चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी चंद्रनगर गावातील शेकडो ग्रामस्थ, महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-आचिर्णे-येथे-शहिद-वीर-लक्/

यावेळी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात चंद्रनगर गावचे सुपुत्र असलेल्या विनोद मिसाळ व अंजनी मिसाळ यांजकडून चंद्रनगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्राप्त झालेल्या स्टडी टेबलचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समिती दापोली व कोमसाप रत्नागिरी पुरस्कृत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित केलेल्या दापोली- खेड- मंडणगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम क्रमांक पटकावलेल्या चंद्रनगर शाळेतील कु. श्रुती मिसाळ हिचा मान्यवरांकडून सन्मान व कौतुक करण्यात आले. चंद्रनगर शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाबरोबरच प्रभातफेरी, साहित्य कवायत, वक्तृत्व, निबंधलेखन, चित्रकला, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबू घाडीगांवकर यांनी केले. मानसी सावंत व रेखा ढमके यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here