🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l दापोली-
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन समारंभपूर्वक पार पडले. यानिमित्त शाळेत सर्व विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्हा परिषद नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य मोहन मुळे यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, चंद्रनगर ग्रामस्थ सेवा मंडळाचे गाव अध्यक्ष श्रीधर जाधव, मुंबई अध्यक्ष प्रकाश मिसाळ, सचिव सुनील रांगले, गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, प्रवीण काटकर, शिक्षण कला क्रीडा संस्थेचे अध्यक्ष सदानंद मुलूख, उपसरपंच राजेंद्र मिसाळ, पोलीस पाटील गौरी पागडे, ग्रामसेवक संदीप सकपाळ, शालेय समितीचे उपाध्यक्ष राकेश शिगवण, चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, विजय मुलूख आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-गिम्हवणे-येथे-केंद्रस्त/
मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत चंद्रनगर शाळेने दापोली तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल ग्रामपंचायत चंद्रनगरच्या वतीने शाळेचा, सर्व शिक्षकांचा यानिमित्त सन्मान व सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड डान्स, नाटीका, नक्कल, गीतगायन, एकपात्री अभिनय यांसारखे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले. वार्षिक स्नेहसंमेलन स्वागत समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत, मनोज वेदक, रेखा ढमके यांनी केले. या कार्यक्रमासाठी चंद्रनगर गाव व परिसरातील अनेक ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.