Kokan: चंद्रनगर शाळेत शाळापुर्व तयारी मेळावा

0
53
चंद्रनगर शाळेत शाळापुर्व तयारी मेळावा
चंद्रनगर शाळेत शाळापुर्व तयारी मेळावा

दापोली- नव्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांना शाळेचा, शिक्षकांचा परिचय व्हावा, शाळेबद्दल गोडी निर्माण व्हावी व शाळाप्रवेशापुर्वी आवश्यक शाळापुर्व तयारी व्हावी यासाठी दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत नुकतेच शाळापुर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांच्या शुभ हस्ते फीत कापून या शाळापुर्व तयारी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, भाग्यश्री जगदाळे, चंद्रनगर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्रीधर जाधव, सल्लागार विजय मुलूख, चंद्रनगर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत, अंगणवाडी सेविका आशाबाई मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय चंद्रनगर गावातील अनेक ग्रामस्थ व पालक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-सावंतवाडीत-५-एकर-जागा-देत/

शाळापुर्व तयारी मेळाव्याच्या निमित्ताने शाळेत आकर्षक सजावट, सेल्फी पाॅईंट निर्माण करण्यात आले होते. इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांसाठी पहिले पाऊल, बौद्धिक व मनोरंजक खेळ, विविध मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांनी चंद्रनगर गावातील इयत्ता पहिलीत दाखलपात्र असलेली सर्व मुले नव्या शैक्षणिक वर्षात शाळेत दाखल होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज वेदक, मानसी सावंत यांनी केले तर मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here