Kokan: चंद्रनगर शाळेत शिक्षण परिषद

0
36
शिक्षण परिषद,
चंद्रनगर शाळेत शिक्षण परिषद

दापोली- सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील दापोली तालुक्यातील गिम्हवणे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच जिल्हा परिषद शाळा चंद्रनगर येथे पार पडली. शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी जोगळे नं. १ शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञेशा तोडणकर या होत्या. या शिक्षण परिषदेसाठीच्या व्यासपीठावर चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, चंद्रनगर ग्रामपंचायतीचे संदीप सकपाळ, भरत गिम्हवणेकर, मुग्धा सरदेसाई, मनोज वेदक, अल्लाउद्दीन फकी आदी मान्यवर उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-मसुरे-कावावाडीत-झाड-कोसळ/

गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील कारखेले याच्या हस्ते शिक्षण परिषदेचे उद्घाटन झाले. शिक्षण परिषदेच्या सुरुवातीस दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी उपस्थित शिक्षकांना प्रशासकीय मार्गदर्शन केले. त्यांनी गिम्हवणे केंद्रातील सर्व शिक्षकांना नव्या शैक्षणिक वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘निसर्ग ऋण’ उपक्रमांतर्गत चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी रोपवाटीकेसाठी जमविलेल्या जंगली झाडांच्या रानबियांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांच्या हस्ते करण्यात आले. गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांनी ‘आनंददायी शनिवार’, NAS- 2024, अध्ययन निष्पत्ती व प्रशासकीय कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. महेश कोकरे यांनी ‘विद्याप्रवेश’ विषयास अनुसरून तर महेश हजारे यांनी ‘फिट इंडीया’ विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने गिम्हवणे केंद्रातून सेवानिवृत्त झालेल्या चंद्रनगर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत, गिम्हवणे शाळेतील विषय शिक्षिका प्रिया पवार, गिम्हवणे शाळेतील उपशिक्षिका निर्मला पारदुले यांचा सेवापूर्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. चंद्रनगर शाळेत पार पडलेल्या या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत यांनी केले. चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here