दापोली- भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन व ध्वजारोहण कार्यक्रम दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत समारंभपूर्वक साजरा झाला. चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, उपसरपंच राजेंद्र मिसाळ, जिल्हा नियोजन समिती सदस्य मोहन मुळे, ग्रा. पं. सदस्य गौरी मुलूख, मानसी मुलूख, संतोष तांबे, शंकर रांगले, सुनील रांगले, शैलेश मुलूख, चंद्रकांत मुलूख, गौरी पागडे, चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, ग्रामसेवक संदिप सकपाळ, शिक्षक बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत, रेखा ढमके, पुनम जाधव आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-वाकवली-हायस्कूलमध्ये-स्/
भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त शाळेत देशभक्तिपर समूहगान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रनगर गावातील अनेक नागरिक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक यांनी सर्वांचे स्वागत केले व शेवटी आभार मानले.
[…] […]