दापोली- दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स काॅलेजचे विद्यार्थी आणि राष्ट्र सैवा योजना संस्थेचे प्रकल्प अधिकारी अजिंक्य मुलुख यांच्या माध्यमातून दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर या शाळेस ‘ग्रंथालय समृद्धी योजना’ अंतर्गत ५० पुस्तके भेट स्वरुपात मिळाली आहेत. यामुळे शाळचे ग्रंथालय अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे .https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-माजी-पंतप्रधान/
दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स काॅलेजचे विद्यार्थी, राष्ट्र सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी असलेले अजिंक्य मुलुख, काॅलेजचे इन्व्हार्नमेंटल हेड प्रा. अनिरुद्ध सुतार, रसायनशास्त्र विभागाचे प्रा. तेजस मेहता, सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रा. जान्हवी दिवेकर यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात ही पुस्तके चंद्रनगर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर यांचेकडे सुपूर्द केली. यावेळी चंद्रनगर शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक बाबू घाडीगांवकर, मनोज वेदक, मानसी सावंत आदी उपस्थित होते.