Kokan: चर्मकार समाज बांधवाना आवाहन

0
122
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ.jpeg
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ

सिंधुदुर्ग– संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चांभार, ढोर, होलार, मोची इत्यादींच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात. महामंडळामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या (एन.एस.एफ.डी.सी.) योजना राबविण्यात येत असून ४८०० लाभाथ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-पू-नामदेव-महाराज-यांच्य/

एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत स्मॉल बिझनेस रु.१ लाख, १.५० लाख व २ लाख, चर्मोद्योग रु.२ लाख, लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी रु.५० हजार रक्कम देण्यात येते. या योजनांसाठी मागील प्रलंबित नस्तीकरिता सुमारे २२.२१ कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे.

सन २००३-२४ या आर्थिक वर्षात एन.एस.एफ.डी.सी.च्या कर्ज योजनेअंतर्गत स्मॉल बिझनेस ५ लाख, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजना प्रत्येकी रु.१.४० लाख तसेच नवीन महिला अधिकारीता योजना ५ लाख मंजूर झालेल्या आहेत. एन.एस.एफ.डी.सी. यांच्या शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून भारतामध्ये २० लाख व विदेशामध्ये रु.३० लाखापर्यंत कर्ज मंजूर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, (कुवारबाव) रत्नागिरी या कार्यालयाशी संपर्क साधावा. सर्व चर्मकार बांधवांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन धम्मज्योती गजभिये, व्यवस्थापकीय संचालक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास, महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here