प्रतिनिधी – पांडुशेठ साटम
कणकवली: केन्द्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी कोकणात जाण्यासाठी रेल्वे सोडत वचनपुर्ती केली आहे. तरी 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1.00 वा बोरीवली वरुन सुटणार्या कोकण रेल्वेच्या उद्घाटनासाठी मोठ्या संख्येने बोरीवली स्टेशनवर उपस्थित रहावे असे आवाहन शरद साटम जिल्हा मंत्री, भाजपा उत्तर मुंबई यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कणकवली-सार्वजनिक-बांधका/
गुरुवार 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1.00 वाजता बोरीवली वरून कोकणात जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या ट्रेनचा नं 09167 असून त्याचे रिझर्वेशन बुधवार 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12.00 वाजता सुरु होईल. हीच ट्रेन पुढील आठवड्यापासून दर बुधवार व शुक्रवार सकाळी 6.50 वा वान्द्रे (गाडी नं 10115) सुटून सकाळी 7.23 वा बोरीवली येथे येईल. तसेच दर मंगळवार व गुरुवार सकाळी 7.40 वा मडगाव (गाडी नं 10116) वरुन सुटेल.
स्थानके :
वान्द्रे, बोरीवली, वसई, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम, करमाली, मडगाव या स्थानकांवर सदर ट्रेन थांबणार आहे.