🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला/ प्रतिनिधी– नगर वाचनालय वेंगुर्ला संस्थेतर्फे अनिल श्रीकृष्ण सौदागर पुरस्कृत कै.पद्माकर सखाराम सौदागर स्मृती चित्रकला स्पर्धा ८ डिसेंबर रोजी घेण्यात आल्या. यात लहान गटात काशिनाथ तेंडोलकर तर मोठ्या गटात चाहत शुक्ला यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.https://sindhudurgsamachar.in/kokan-पाठांतर-स्पर्धेत-भार्गव/
इ.५वी ते ७वी गटामध्ये तालुक्यातील १३ शाळांमधून ६३ मुले सहभागी झाली होती. यात प्रथम-काशिनाथ तेंडोलकर (मठ नं.१), द्वितीय-तेजल कोटकर (मतद तेरेसा स्कूल), तृतीय-चिन्मयी जोशी (राऊत विद्या.रेडी), चतुर्थ-हर्षांक टेमकर (सिधुदुर्ग विद्या.निकेतन), पाचवा-भुमिका असनकर (वेंगुर्ला नं.४) यांनी क्रमांक पटकाविले. इ.८वी ते १०वी गटासाठीही तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात प्रथम-चाहत शुक्ला (वेंगुर्ला हाय.), द्वितीय-मनोहर खाडे (दाभोली स्कूल), तृतीय-स्नेहल चुडजी (सिधुदुर्ग विद्यानिकेतन), चतुर्थ-सर्वेश मेस्त्री (पाटकर हाय.), पाचवा-प्राजक्ता शिरोडकर (सिधुदुर्ग विद्यानिकेतन) यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण ए.टी.काळे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनिल सौदागर, कैवल्य पवार, महेश बोवलेकर, श्रीनिवास सौदागर यांनी सहकार्य केले. स्पर्धेतील विजेत्यांना १९ जानेवारी रोजी पारितोषिके व प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहेत.