🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कुडाळl मनोज देसाई
चेंदवण येथील श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयाच्या दहावी विद्यार्थ्यांना परीक्षा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यीनी सौ.सुधा पुंडलिक भरडकर व आताचे सौ. सुप्रभा सुरेश कामत व श्रीयुत सुरेश शांताराम कामत हे लाभले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-जीबीएसमुळे-राज्यातील-य/
प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.माणिक पवार यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले..शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी कामत यांनी हायस्कूल च्या निर्मिती मध्ये, आपल्या वडिलांचे योगदान काय होते हे सांगितले.. तसेच कामत गुरुंजीनी विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगितले जीवनाची दिशा आताच ठरवा..नंतर, वेळ गेलेली असते असे मोलाचं यावेळी मार्गदर्शन केले.
कामत उभयतांनी शाळेला भरघोस अशी आर्थिक मदत केली.. अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष देवेंद्र नाईक होते.त्यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना प्रामाणिक प्रयत्न करा यश मिळेल असे म्हटले. कांबळी मॅडम, नाईक सर यांनी शुभेच्छा दिल्या.. तसेच कवठी पोलिस पाटील विठ्ठल राणे यांनीही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.. यावेळी संस्था सदस्य श्री.सूर्यकांत शृंगारे,चेंदवण पोलिस पाटील पेडणेकर, पालक सदस्य छाया रेंवडकर, अंगणवाडी सेविका नाईक , अंगणवाडी सेविका विनिता मेस्त्री, अंगणवाडी सेविका राऊत , चंद्रकांत चेदवणकर, सदाशिव टुंबरे.. आदी पालक उपस्थित होते… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सांगळे व दिप्ती धुमाळ यांनी केले. तर, आभार शाळा समिती सदस्य संजय नाईक यांनी मानले.