कणकवली:– तालुक्यातील खारेपाटण या गावातील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज दुपारी १२.३० ते १२.४५ च्या दरम्यान अनोळखी व्यक्तीने हातोहात एका ग्राहकाच्या हातातील १ लाख रक्कमेपैकी २३ हजार ५०० लंपास केली. तो चोरटा बँकेच्या बाहेर गेल्यानंतर ग्राहकाला ही बाब समजली. या सदर घटनेमुळे बँकेत तसेच खारेपाटण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-गोळवण-ग्रामस्थ-मंडळ-मुंब/
याबाबत अधिक वृत्त असे की खारेपाटण बाजारपेठ येथे असलेल्या वैश्यवाणी सहकारी पतसंस्थेचे शिपाई कर्मचारी स्वप्नील सदानंद घाटगे (वय २१ वर्षे राहणार फोंडाघाट)हा खारेपाटण एस टी बस स्थानक येथे असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत संस्थेने दिलेले चलन घेऊन बँकेत पैसे काढण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने काऊंटर वरून सुमारे १ लाख रुपये घेतले व तो समोरील टेबलावर रक्कम मोजत असतानाच त्याच्यावर अगोदरच पाळत ठेवून बसलेला अज्ञात चोरट्याने त्याच्या हातातील रक्कम हिसकावून घेत यातील या काही ५०० रुपयाच्या नोटा खोट्या असल्याचे त्याला भासवून त्याचेकडील पैसे हात सफाईने व चलाखीने काढून घेत तेथून लगेच पळ काढला. आपली फसवणूक झाली ही बाब या कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्याने संबधित बँक अधिकारी यांना सांगितले. मात्र चौकशी करेपर्यंत सदर चोरटा पळून गेल्याचे निदर्शनास आले.घटनेची माहिती मिळताच खारेपाटण पोलीस दुरशेत्राचे पोलीस अधिकारी श्री उद्धव साबळे तसेच खारेपाटण येथील वैश्यवाणी सहकारी पतसंस्थेचे शाखा कर्मचारी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानीक बँक अधिकारी यांना सोबत घेऊन सी सी टी व्ही फुटेज चेक केले. मात्र या चोरी प्रकरणात एकच चोरटा नसून आजूनही एक दोन व्यक्ती सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून फुटेज मध्ये दिसणारे व्यक्ती अनोळखी असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान दुपारी २.०० नंतर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री अमित यादव व पोलीस उपनिरीक्षक श्री शरद देठे तसेच वैश्यवाणी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री दिलीप पारकर यांनी चोरी झालेल्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तर १ लाख रुपये रकमे पैकी सुमारे २३,५०० /- रुपये एवढी रक्कम अनोळखी अज्ञात चोरट्याने पसार केली असून या घटनेचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दुरशेत्राचे पोलीस अधिकारी उद्धव साबळे व त्यांचे सहकारी करीत आहेत. दैनिक सिंधुदुर्ग समाचार