Kokan: जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी व अंकिता प्रथम

0
89
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ,
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी व अंकिता प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील ग्रंथालय उपक्रमा अंतर्गत शिवजयंतीचे औचित्य साधून सलग २३ व्या वर्षी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खुल्या गटातून अंकिता पाटील तर शालेय गटातून श्रावणी आरावंदेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकणात-परब-पतपेढीची-तिसर/

स्पर्धेचे उद्घाटन प्रा.वामन गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक शितोळे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, परिक्षक डॉ. पी.आर.गावडे, डॉ.बी जी.गायकवाड,  प्रा.व्ही.पी. नंदगिरीकर,  प्रा.शशांक कोंडेकर उपस्थित होते.

खुल्या गटासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मसहिष्णूता‘ हा विषय ठेवण्यात आला होता. यात प्रथम-अंकिता पाटील, द्वितीय-अमित कुंटे, तृतीय-सायली खोत, उत्तेजनार्थ-संग्राम कासले, वीणा गावडे तर शालेय गटासाठी ‘रयतेचा राजा शाहू महाराज‘ हा विषय ठेवण्यात आला होता. यात प्रथम-श्रावणी आरावंदेकर, द्वितीय-अदिती चव्हाण, तृतीय-दिप्ती गवसकर, उत्तेजनार्थ-कर्तृत्वा हरकुळकर व अमृता नवार यांनी क्रमांक पटकाविले. खुल्या गटाचे परिक्षण डॉ.पी.आर.गावडे, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर यांनी तर शालेय गटाचे परिक्षण डॉ.बी.जी.गायकवाड, प्रा.शशांक कोंडेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.सचिन परूळकर यांनी, स्वागत सुनिल आळवे यांनी तर प्रा.पी.एम.देसाई यांनी आभार मानले.

फोटोओळी – वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here