Kokan: जिल्हा रुग्णालयासमोर करणार आत्मदहन

0
14
सावंतवाडी रक्तपेढीत कर्मचारी भरण्याची मागणी..
सावंतवाडी रक्तपेढीत कर्मचारी भरण्याची मागणी..

सावंतवाडी रक्तपेढीत कर्मचारी भरण्याची मागणी

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी ही केवळ दोन जणांच्या जीवावर सूरु आहे. पदभरती करणं आवश्यक असताना केवळ दोघांच्या जीवावर ही ब्लड बँक चालू आहे. वारंवार निवेदने देऊन इशारे देऊन देखील पदभरती केली जात नाही आहे. गेले ६ महिने लक्ष वेधून, पत्रव्यवहार करून प्रशासन दखल घेत नाही आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पद न भरल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करू असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला. सोमवारी काळी फीत बांधून रक्तदात्यांनी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर आरोग्य प्रशासनाचा निषेध नोंदवला. https://sindhudurgsamachar.in/kokan-ओटवणेत-आरोग्य-तपासणी-शिब/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here