फोटोओळी – आरवली येथील वेतोबा तळीची स्वच्छता करण्यात आली.
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला प्रतिनिधी-
‘स्वच्छ जल, स्वच्छ मन‘ अभियानाच्या तिस-या टप्प्यात सिधुदुर्ग जिल्ह्यातील पाच ठिकाणच्या जलस्त्रोतांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये ब्रह्मेश्वर तळी (बांबुळी), गणपती साना (कणकवली), महादेव मंदिर तळी (नाधवडे), देवगड समुद्र किनारा यांच्यासह वेंगुर्ला तालुक्यातील आरवली वेतोबा मंदिराच्या तळीचा समावेश आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्याच्या-अर्थसंकल्प/
या स्वच्छता मोहिमेत ६५० पेक्षा जास्त निरंकारी सेवादल स्वयंसेवक व भाविक भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. परम वंदनीय सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या आशीर्वादाने ‘अमृत प्रोजेक्ट‘ अंतर्गत हे अभियान राबविण्यात आले.