Kokan: जि.प.अहमदनगर समितीची परूळे ग्रा.पं.ला भेट

0
28
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान,
जि.प.अहमदनगर समितीची परूळे ग्रा.पं.ला भेट

वेंगुर्ला प्रतिनिधी- राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हापरिषद अहमदनगरच्या समितीने परूळे बाजार ग्रामपंचायतीला भेट देत विविध उपक्रमांची पाहणी केली.  https://sindhudurgsamachar.in/kokan-निवृत्त-शिक्षकांनी-संघट/

यावेळी समितीने काथ्याप्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया युनिट, प्लॅस्टिक कचरा संकलन युनिट, प्रक्रिया संकलन युनिट, अंगणवाडी, शाळा, व्यायामशाळा यांजबरोबर इतर उपक्रमांची माहिती घेऊन कौतुक केले. पंचायत समिती नेवासाचे सहाय्यक गटविकास अधिकारी पाटेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेटये, कोपरगांव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शेख, नगरचे विस्तार अधिकारी सानपुने, श्री.डोके, श्री.पाखर, जिल्हा व्यवस्थापक आर.जी.एफ.ए.विजय गायकवाड यांसह सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक उपस्थित होते. सर्वांचे स्वागत परूळे उपसरपंच संजय दूधवडकर यांनी तर ग्रामसेवक मंगेश नाईक यांनी माहिती दिली.

फोटोओळी – जिल्हापरिषद अहमदनगरच्या समितीने परूळे बाजार ग्रामपंचायतीला भेट देत विविध उपक्रमांची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here