पाईपलाईन खोदाईमुळे मडुऱ्यातील पूलाला धोका
बांदा ता.२६-: मडुरा-शेर्ले मार्गावरील मारुती मंदिर नजीक असलेल्या पुलाच्या बाजुने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाईपलाईन टाकण्यासाठी दुर्घटना घडण्यासारखी खोदाई केली आहे. परिणामी एका बाजूने पुलाचा भराव कोसळत असून पूल समांतर संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे. पावसाळा सुरू झाला तरी ठेकेदार याकडे गंभीरतेने लक्ष देत नाही. https://sindhudurgsamachar.in/kokan-जिल्हा-रुग्णालयासमोर-कर/
त्यामुळे अशा ठेकेदारांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्याचा आशीर्वाद आहे, असा सवाल करत भविष्यात पुलावर जीवित हानी झाल्यास अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा, भाजप सावंतवाडी तालुका कार्यकारणी सदस्य तथा मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी दिला आहे.


